नमस्कार सज्जन हो !
श्री कृष्ण जयंती जवळ आली आहे. या
निमित्ताने नवा , अस्मादिकास स्फुरलेला ,
पाळणा सादर
करीत आहे –
जो जो जो
जो रे || श्रीरंगा ! || करिसी भव-भय –भंगा || बाळा ,जो जो
रे || धृ . ||
|| ओम ||
कंसे जमवियले || सर्व खळ || कुणी नाही निर्मळ ||
सज्जन दुर्बळ || त्रस्त अती || मुखाकडे तव बघती ||१||
कृष्णा ! ध्यान तुझे || करी माझे || सर्व रिकामे ओझे ||
भीती सांडूनिया || जाणीयली || पूतनेसी मारीयली || || २ ||
भिउनी तुज बाळा ! || शरण तुला || नाग कालिया आला ||
गोपी गोपाना || आवडल्या || तुझ्याच
बालक - लीला || ३ ||
गोवर्धना धरी || गो , पाळी ||गोपाभिमान
टाळी ||
अर्जुन सर्व अम्ही || ना कामी || रणांगणी वा धामी
|| ४ |\
लढणे कोणाशी ? || स्वकियांशी ? || मग
आयुष्य हताशी ||
होतो निरुपाय || करू काय ||
दावी काही उपाय || ५
||
देवकी वसुदेवा || "भाग्यासी ||
दिधले " ,तैसे देसी ||
राहुनी सर्वात || ना लिप्त || राहणे च दुर्घट || ६ ||
बाळा ! ऐक आता || हरी दुरिता || दे
आम्हा अद्वैता ||
;मीपण ' माझे हे || सम्पू दे || पाळण्यासी
गुम्फू दे || ७ ||
बाळा ! जो जो रे
|| श्री रंगा ! || करिसी भव-भय –भंगा || |बाळा !
जो जो रे .........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा